rekhe jare.png
rekhe jare.png 
राज्य

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून

मुरलीधर कराळे

नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या, तथा यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे (वय 40) यांच्यावर आज रात्री नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव घाटात दुचाकीवर आलेल्या दोघांनी खुनी हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

रेखा जरे, त्यांची आई, मुलगा व महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने, असे सर्व जण मोटारीने पुण्याहून नगरकडे येत होते. शिरूरच्या पुढे निघाल्यावर मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या मोटारीला कट मारला. नंतर मोटारीला ओव्हरटेक करीत पुढे जाऊन दुचाकी आडवी लावली. मोटार थांबल्यानंतर त्यांनी जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. बाचाबाची सुरू असतानाच, एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपी तेथून दुचाकीवर पसार झाले. 

विजयमाला माने यांनी स्वत: मोटार चालवित सुपे येथे आणले. तेथून जरे यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, हारून मुलाणी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेचा तपास सुरू केला.

रेखा जरे या पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलनात कायम सहभागी होत असत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या वेळी त्या महिला आघाडीत अग्रभागी होत्या. महाराष्ट्रात महिला आघाडीत त्या अग्रभागी होत्या. महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT