Nandurbar 
राज्य

नंदुरबार पालिकेत कॉंग्रेस -भाजप सदस्य येतात पोलीस संरक्षणात  !

नंदुरबार : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या महिन्यात कॉंग्रेस व भाजप नगरसेवकांची हातपायी झाली होती. त्या पृष्ठभूमीवर काल झालेल्या सर्वसाधारण सभेसाठी दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी पोलिस संरक्षण मागितले होते. पोलीसांनीही ते दिले.

दीपक कुलकर्णी

नंदुरबार  : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या महिन्यात कॉंग्रेस व भाजप नगरसेवकांची हातपायी झाली होती. त्या पृष्ठभूमीवर काल झालेल्या सर्वसाधारण सभेसाठी दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी पोलिस संरक्षण मागितले होते. पोलीसांनीही ते दिले. मग दोन्ही गटांनी संरक्षण मागितल्याने नेमका धोका कोणाला कोणाकडून होता?हा प्रश्‍न अनुत्तरीत राहिला. 

नंदुरबार पालिकेत कॉंग्रेसची सत्ता आहे. 39 सदस्यांत 10 भारतीय जनता पक्षाचे, 28 कॉंग्रेस, शिवसेनेचे आहेत एक जागा रिक्त आहे. 3 एप्रिलला पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. तीत विषय पत्रिकेतील चर्चेवरून वाद झाला. कॉंग्रेस भाजप नगरसेवक समर्थकांची हातापायी झाली. परस्परांना मारहाण केली. दोन्ही गटांनी एकमेकावर विनयभंग, मारामारीचा गुन्हा दाखल केला आहे. 

वादाच्या या पार्श्‍वभूमीवर काल पालिकेची सभा झाली. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी अध्यक्षस्थानी होत्या. सभेला सकाळी अकराला प्रारंभ झाला. सभागृहात केवळ सभेशी निगडित अधिकारी, कर्मचारी, नगराध्यक्षा, सदस्यांना ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात आला. इतका बंदोबस्त अन प्रवेशासाठी ओळखपत्राची तपासणी पदाधिकारी निवडणुकीच्या दिवशीही होत नाही. 

सभेत मोबाइलला बंदी होती. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना मज्जाव होता. प्रारंभीच्या काही मिनीटांचे छायाचित्रण होताच छायाचित्रकारांना बाहेर पाठवण्यात आले. कडक बंदोबस्तात झालेल्या या सभेत दोन्ही पक्षांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र हे संरक्षण कोणी आणि कोणापासून धोका असल्याने होते हे अद्यापही गुलदस्त्यात राहिले.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT