NCP Workers in Neral Entered Shivsena
NCP Workers in Neral Entered Shivsena 
राज्य

तिवरे ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रवादीला खिंडार अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सरकारनामा ब्युरो

नेरळ : कर्जत तालुक्‍यातील तिवरे ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत त्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तिवरे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना विकासकामांपासून वंचित राहावे लागल्याने लाडीवली येथील माजी सरपंच सुभाष लक्ष्मण मिसाळ, तसेच राजाराम बैलमारे यांच्यासह असणाऱ्या नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. परिसरात राष्ट्रवादीला जोरदार खिंडार पडले असून, शिवसेनेचे प्राबल्य वाढत आहे.

कर्जत तालुक्‍यातील तिवरे ग्रामपंचायत हद्दीतील लाखरण, लाडीवली आदी गावांतील ग्रामस्थांसमोरील समस्या, खोळंबलेली विकासकामे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांतून पूर्ण व्हावीत. यासाठी लाडीवली येथील माजी सरपंच सुभाष लक्ष्मण मिसाळ व भाऊ राजाराम बैलमारे यांच्यासह असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. 

या वेळी तिवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुभाष मिसाळ, नरेश भासे, भाऊ बैलमारे, नीलेश लबडे, कृष्णा लबडे, प्रकाश तुपे, आतिश तुपे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोविंद बैलमारे, हरिचंद्र बैलमारे, प्रकाश बैलमारे, गणेश बैलमारे, अंकुश बैलमारे, सुनील बैलमारे, राजेश लबडे, योगेश लबडे, मंगल पवार, योगेश पवार, मधू हिलम, विजय आलिमकर, रवींद्र वाघमारे, किसान पवार, संतोष पवार, अरुण पवार, सदानंद वाघमारे, पांडू वाघमारे, गुरुनाथ बैलमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश प्रवेश केला. 

याप्रसंगी विभागप्रमुख सुनील ठाकूर, माजी विभागप्रमुख उपसरपंच भालचंद्र घोडविदे, वरई शाखाप्रमुख भानुदास ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य संजय तिखंडे, संतोष भासे, केशव ठाकरे, सदानंद भासे, रवींद्र भासे, दत्ता भासे, लाडीवली शाखाप्रमुख सुरेश तुपे, लाखरण शाखाप्रमुख शैलेश मिसाळ, लाडीवली युवा शाखाप्रमुख दिनेश बैलमारे, माजी शाखाप्रमुख हरिचंद्र दगडे, गिरीश दगडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT