sathe.png
sathe.png 
राज्य

अधिकाऱ्याचा बडेजाव सोडून निर्मला साठे यांनी घडविला दुर्गम भागात आदर्श

शांताराम काळे

अकोले : आपण अधिकारी आहोत, हा बडेजाव न करता त्या आदिवासी पट्ट्यातील दुर्गम भागही पिंजून काढत आहेत. वाडीवस्त्यांवर, पाड्यांवर जाऊन आॅनलाईन शिक्षण, शालेय पोषण आहार, शिक्षण प्रक्रिया, स्वच्छता आदींची माहिती स्वतः घेऊन तपासणी करीत आहेत. विस्तार अधिकारी निर्मला साठे हे त्यांचे नाव. अकोल्यात त्यांनी आपल्या कामाची चुनूक दाखवून कोरोनाला घाबरून घरात बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. 

आपण विस्तार अधिकारी नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकीचे स्वप्न उराशी बाळगून त्या रोज कोरोनाशी संघर्ष करत आदिवासी व दुर्गंम भाग असलेल्या वाडीवस्तीत जाऊन, शालेय पोषण आहार, ऑनलाईन शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, अपडेट रेकॉर्ड, स्वच्छता उपस्थिती यांची तपासणी करतात. त्या महिला अधिकारी कुमारी साठे आपल्या कामाची आदर्श चुणूक दाखवून झालेल्या चुकावर पांघरूण न घालत शिक्षकांच्या कामात बदल कसा होईल, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम हाती घेऊन सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात अधिकाराचा रुबाब गाजवून आपल्या कार्यालयात सर्व माहिती बोलवून तेथूनच वरिष्ठ कार्यालयात माहिती पाठविणाऱ्या पाट्या टाकून आपले काम हातावेगळे करणाऱ्या बाबूच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या ठरल्या आहेत.

निर्मला साठे या नारायणडोहो (ता. नगर) येथील आहे. एम. ए. एलएल. बी. सेट (शिक्षण) असे शिक्षण पूर्ण करून त्या 2013 मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाल्या. ऑगस्ट 2020 पासून राजूर बीट आदिवासी क्षेत्र येथे बदलीने हजर झाल्या आहेत. 

याबाबत साठे म्हणाल्या, वडील निवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामूळे शिक्षण क्षेत्राकडे ओढ होतीच. कायद्याचे शिक्षण घेवून मी त्यातच करिअर करावे, अशी आईची इच्छा होती. मधल्या काही काळात प्राथमिक शाळा, आकाशवाणी केंद्र, अध्यापक विदयालय, अशा विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्यानंतर विस्तार अधिकारी (शिक्षण ) म्हणून शिक्षण विभाग (प्राथ) जिल्हा परिषद नगर येथे 2013 साली रुजू झाले. ऑगस्टमध्ये बदलीने राजूर बीट आदिवासी क्षेत्र येथे हजर झाले. बीटातील 18 शाळांना भेटी देवून मूख्याध्यापक, शिक्षक, काही विद्यार्थी, काही पालक यांच्याशी सुसंवाद साधला. त्यानुसार बीटातील काही शाळांमध्ये आॅनलाईन वर्ग अध्यापन, सोशल मीडियाचे ग्रुप, आदी द्वारे शाळामध्ये अध्यापन सुरु असून, ज्या विद्यार्थ्याकडे ही साधने उपलब्ध नसतील, त्यांना अभ्यासाच्या हार्ड कॉपी द्वारे सर्व सुरक्षितता बाळगून प्रशिक्षण दिले जाते.

शिक्षक फोनद्वारे विदयार्थी व पालकांच्या संपर्कात राहून विदयार्थ्याचा अभ्यास घेतात. काही शाळांमध्ये शिक्षक स्वतःथोडया मुलांचा गट करुन सर्व खबरदारी बाळगून अध्यापन करतात. शंभर टक्के शिक्षणाची साधन उलब्धता, नेटवर्क आदी बाबत समस्या असल्या, तरी गट शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शनानूसार शंभर टक्के विद्यार्थ्यIचे शिक्षण सुरू राहण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेवून सर्व सुरक्षित उपाययोजनाचा अवलंब करण्याच्या तसेच शाळानिहाय स्वंतत्र कृती कार्यक्रम तयार करण्याबाबतच्या सूचना त्यांनी शाळा स्तरावर दिल्या आहेत.

स्वतः बद्दल सांगताना त्या म्हणाल्या, की मी वकिली करू शकले असते, पण माझे वडील प्राथमिक शिक्षक त्यामुळे मला घरातून संस्कार मिळाल्याने मी शिक्षण क्षेत्र निवडले. या कामात मी समाधानी आहे. तालुका आदिवासी व दुर्गम असला, तरी येथील निसर्ग काश्मीर सारखा आहे. तर माणसे देखील समजून घेणारी आहेत. त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद शाळा निश्चित चांगले व आदर्शवत काम करतील. याचा मला विश्वास आहे., मात्र कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना संधी देऊन त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर त्यांच्यावर कारवाई देखील होईल, चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना निश्चित प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT