number of ssc and hsc student will going to increase
number of ssc and hsc student will going to increase 
राज्य

दहावी-बारावीचे विद्यार्थी वाढणार?

संतोष सिरसट

सोलापूर - राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला आहे. त्याचबरोबर नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी दहावी व बारावीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर राज्यातील सर्व शाळा मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद ठेवल्यामुळे शासनाने सुरवातीला पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष अपूर्णच राहणार आहे. हे ओळखून शासनाने नववी व अकरावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता ज्यावेळी शाळा सुरु होतील, त्यावेळी नववीचे विद्यार्थी थेट दहावीच्या तर अकरावीचे विद्यार्थी थेट बारावीच्या वर्गात बसणार आहेत. 

नववीच्या वर्गामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करुन गुणवंत विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात प्रवेश दिला जात होता. ही गोष्ट शासनाच्या लक्षात आल्यानंतर मागील एक-दोन वर्षांपूर्वी शासनाने नववीच्या वर्गात विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करता त्याची फेरपरीक्षा घेण्याच्या सूचना राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या मुलांच्या प्रमाणात घट झाली होती. विशेष करुन शहरातील किंवा ग्रामीण भागातील ज्या मोठ्या शाळा आहेत, त्या शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी नववीत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करत होत्या. पण, शासनाच्या त्या निर्णयामुळे त्यावर आळा बसला होता. त्यातच आता कोरोनामुळे नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या सूचना दिल्यामुळे साहजिकच पुढील वर्षी दहावी व बारावीच्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या निश्‍चितच वाढणार आहे.

नववीत सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. त्यामध्ये जर तो पास झाला तर त्याला दहावीत प्रवेश दिला जातो. आताही जर एखादा विद्यार्थी पहिल्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण असेल तर त्याची फेरपरीक्षा घेऊन त्याला दहावीत प्रवेशाची संधी मिळू शकते. पुढील वर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थी संख्येत थोडीशी वाढ होऊ शकते. 
- सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT