3hasan_mushrif_final.jpg
3hasan_mushrif_final.jpg 
राज्य

ऑनलाइन शाळा ऍप राज्यभर वापरण्याचा विचार... 

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड मयुरेश पाटील यांनी तयार केलेले व सध्या कागल तालुक्‍यात कार्यान्वित असलेले "ऑनलाईन शाळा" हे सॉफ्टवेअर संपूर्ण राज्यभर लागू करण्याचा विचार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सुरुवातीला अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्‍ट म्हणून हे ऍप तात्काळ वापरणार आहे, सध्या राज्यात हे ऍप एकमेव कागल तालुक्‍यात वापरले जात असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

हे ऍप संपूर्ण राज्यभर लागू करण्याच्या विचाराने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात एक व्यापक बैठक आयोजित केली होती. बैठकीला ग्रामविकास खात्याचे मुख्य सचिव अरविंदकुमार, कागलचे गट शिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयुरेश पाटील, महादेव गुरव, रमेश कदम, विशेष कार्य अधिकारी रवींद्र पाटील, कक्ष अधिकारी श्री भांडारकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्‍टरद्वारे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

कोरोना महामारी संपल्यानंतरसुद्धा हे ऍप कायमस्वरूपी कसे उपयोगी पडेल, उजळणी कशी घेता येईल व इतर अनुषंगिक बाबींची सविस्तर माहिती घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी तात्काळ कोल्हापूर व अहमदनगर या दोन्ही जिल्ह्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन हे ऍप कार्यान्वित करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
 
शाळा बंद पण शिक्षण चालू
"शाळा बंद पण शिक्षण चालू"..... हे ब्रीद घेऊन संदीप गुंड आणि मयुरेश पाटील यांनी हे ऍप तयार केले आहे. यामध्ये विद्यार्थी अभ्यास करतो की नाही, याचा फीडबॅक घेता येतो. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला, याची सदर यादी आपल्याला पाहायला मिळते. तसेच ऑनलाइन परीक्षासुद्धा घेता येते. याचा संपूर्ण डाटा गटशिक्षणाधिकारी लॉंगिनला मिळतो. त्यामुळे प्रशासनाला सुद्धा याची मदत होते.

Edited  by : Mangesh Mahale      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT