Pawar-Fundkar
Pawar-Fundkar 
राज्य

शरद पवारांच्या शब्दाचा  पांडूरंग फुंडकरांनी राखला मान

तुषार खरात : सरकारनामा न्यूज ब्युरो

मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये `अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट` हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. पण या अभ्यासक्रमांना भारतीय कृषी संशोधन परिषदेची मान्यताच नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम चालविणारी कृषी महाविद्यालये अडचणीत आली आहेत. या महाविद्यालयांना वाचविण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला व त्यानुसार कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला कृषी संशोधन परिषदेची मान्यता नसल्याने या अभ्यासक्रमासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यंदापासून सर्व कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारच्या सीईटी सेलमार्फत केंद्रीभूत पद्धतीने होणार आहे. पण अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटला त्यातून वगळण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शुल्कमाफी सुद्धा या अभ्यासक्रमासाठी लागू असणार नाही. 

त्यामुळे हा अभ्यासक्रम चालविणारी महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. अनेक संस्थाचालकांनी शरद पवार यांना साकडे घातले होते. त्यानुसार पवार यांनी कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांना या महाविद्यालयांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत विनंती केली होती. पवार यांची फुंडकर व प्रमुख अधिका-यांसोबत एक बैठकही काही दिवसांपूर्वी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार आता राज्याच्या कृषी विभागाने कृषी संशोधन परिषदेला पत्र लिहिले असून अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला मान्यता देण्याची विनंती केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT