Sunil Kedar - Patole - Thakre
Sunil Kedar - Patole - Thakre 
राज्य

उपराजधानीत बनले पटोले, केदार, ठाकरेंचे त्रिकूट; शहराध्यक्षांचे विरोधक हतबल...

राजेश चरपे

नागपूर : नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे City President of Congress Vikas Thakre यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी जिवाचे रान केले होते. त्यासाठी मुंबई आणि दिल्ली वाऱ्याही केल्या. पण आता उपराजधानीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, State President of Congress Nana Patole पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Animal and Husbandery Minister Sunil Kedar आणि आमदार विकास ठाकरे यांचे मजबूत त्रिकूट तयार झाले आहे. यामुळे विकास ठाकरे यांचे विरोधक हतबल झाले आहेत. 

अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना ते विकास ठाकरे यांचेच ऐकत होते. त्यामुळे त्यांना नागपूरमधून फटाके लावण्याचा प्रयत्न झाला होता. चव्हाण यांनी संयमाने सर्वांना हाताळले. सोबतच त्यावेळचे हेवीवेट नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना निलंबित करण्याचा धाडसी निर्णयही घेतला. चव्हाण किमान विरोधकांचे म्हणणे ऐकून तरी घेत होते. मात्र नाना पटोले कोणाचेच ऐकायलाही तयार नाहीत. अशा परिस्थितीत शांत बसणे हाच एकमेव पर्याय ठाकरे विरोधकांसमोर उरला आहे. दुसरीकडे पटोले, केदार, ठाकरे या नेत्यांचे नवे त्रिकूट जिल्ह्यात तयार झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री नितीन राऊतही समर्थकांना कुरवाळण्यापेक्षा आपले मंत्रिपद कसे टिकून राहील, यातच अधिक व्यस्त आहेत.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या जबरदस्त ‘बांधणी’मुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक चांगलेच हतबल झाले आहेत. मुंबई, दिल्लीत जाऊन आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा आता महापालिकेच्या निवडणुकीत आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी अध्यक्ष बदलण्याचा अजेंड्याला स्वल्पविराम दिल्याचे समजते. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या विरोधकांनी महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील यांची दिल्लीत भेट घेतली. ठाकरे सात वर्षांपासून अध्यक्ष आहेत. ते आमदार झाले आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त झाले आहे. आता त्यांना बदला अशी मागणी करण्यात आली. पाटील यांनी अध्यक्ष कोण हवा आहे, अशी विचारणा केली. तसेच तीन नावे सुचविण्यास सांगितले. सर्वांनी एकमताने ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांचेच नाव सुचवले. सर्वांच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकल्यानंतरही हवा तसा प्रतिसाद पाटील यांनी दिला नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही कल ठाकरे यांच्याच बाजूने आहे. 

फेरबदलासाठी प्रदेशाध्यक्षांच्या संमती आवश्यक राहणार आहे. महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. हे बघता अध्यक्ष बदलण्याची कुठलीही शक्यता सध्यातरी ठाकरेंच्या विरोधकांना वाटत नाही. निवडणूक जाहीर झाली तर प्रदेशाध्यक्ष पटोले आणि शहराध्यक्ष ठाकरे यांच्याच हाती उमेदवारी वाटपाचे सूत्र राहणार आहे. आता जास्त गडबड केली तर महापालिकेत उमेदवारीही मिळणार नाही आणि बंडखोरी करणे कोणालाच परवडणारे नाही, हे लक्षात आल्याने विरोधकांनी आपल्या तलवारी सध्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT