The pattern of Satara and Pune District Bank is now in the state as well 
राज्य

सातारा आणि पुणे जिल्हा बॅंकेचा पॅटर्न आता राज्यातही

आता ही दोन्ही कर्जाची उर्वरित दोन टक्के व्याज सवलत राज्य सरकारच देणार आहे. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. याबाबतचा आज अर्थसंकल्पिय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूदही केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

सातारा : सातारा व पुणे जिल्हा बॅंकेने सुरू केलेल्या तीन लाखांपर्यंतच्या शून्य टक्के व्याजदाराने पीक कर्ज वाटपाचा सातारा पॅटर्न आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षापासून (2021-22) पासून याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प घोषणा केली. याबाबत अर्थसंकल्पातही भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज मिळू शकणार आहे. 

राज्यात पीक कर्जाचा व्याजदार सात टक्के आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून तीन टक्के व्याज सवलत परतावा देते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज चार टक्के व्याजाने पडत होते. याला पुणे व सातारा जिल्हा बॅंक दीड शतकापासून अपवाद होती. सातारा जिल्हा बॅंक गेल्या 15 वर्षांपासून तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने देत आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना व्याज सवलत मिळणसाठी केंद्राकडून तीन टक्के व राज्य कडून दोन टक्के व्याज सवलत परतावा मिळत होता. उर्वरित दोन टक्के व्याज हे बॅंक स्वत:च्या नफ्यातून करत होती. तर एक लाख ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज सहा टक्के व्याजाने दिले जात होते. त्यापैकी तीन टक्के केंद्र सरकारकडून तर एक टक्के राज्य सरकारकडून व्याज सवलत परतावा दिला जात होता. तर उर्वरित दोन टक्के जिल्हा बॅंक नफ्यातून तरतूद करत होती.

पण आता ही दोन्ही कर्जाची उर्वरित दोन टक्के व्याज सवलत राज्य सरकारच देणार आहे. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. याबाबतचा आज अर्थसंकल्पिय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूदही केली आहे. 

सातारा जिल्हा बॅंकेने सर्व प्रथम या शुन्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. सुरवातीला एक लाखांपर्यंत व त्यानंतर एक ते तीन लाखांपर्यंत त्यांनी शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. आज हाच निर्णय संपूर्ण राज्यातील जिल्हा बॅंकांना पीक कर्जासाठी लागू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT