Mp Imtiaz Jalil Appeal To Marathwada People News Aurangabad
Mp Imtiaz Jalil Appeal To Marathwada People News Aurangabad 
राज्य

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी आता जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. रेल्वे बोर्ड, केंद्र सरकार व आतापर्यंत झालेल्या प्रत्येक रेल्वे मंत्र्यांनी मराठवाड्यावर अन्याय केला आहे. निवेदन, पत्र, प्रत्यक्ष भेटी घेऊन देखील सरकार मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही. (People will now have to take to the streets for railway issues in Marathwada.) आता लोकांना रस्त्यावर उतरूनच आंदोलन करावे लागले, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

गेली ३०-३५ वर्ष मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी झटणारे ज्येष्ठ कार्यकर्ते ओमप्रकाश वर्मा यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. (AIMIM MP Imtiaz Jalil) त्यांची भेट घेऊन इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना मराठवाड्यातील रेल्वे प्रश्ना संदर्भात निवेदन दिले. (Marathwada Railway Issues) त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील यांनी रस्त्यावर उतरण्याशिवाय आता पर्याय नसल्याचे म्हटले आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेने सातत्याने मराठवाड्यावर अन्याय करत सापत्न वागणूक दिली आहे. रेल्वेचे अधिकारी येथील रेल्वे प्रश्नांकडे ढुंकून देखील पाहत नाहीत. ओमप्रकाश वर्मा हे सातत्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न घेऊन रेल्वे बोर्ड व केंद्रातील मंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील चाळीस वर्ष या प्रश्नावर खर्ची घालते, तरी देखील केंद्रात बसलेले रेल्वे बोर्डाचे अधिकारी त्याची दखल घेत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

आज देखील वर्मा यांनी उपोषण करत गेंड्याची कातडी असलेल्या रेल्वे प्रशासनाचे लक्ष मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, नव्या रेल्वे, वाढीव डब्बे, पीटलाईन असे अनेक प्रश्न या भागातील आहेत. ज्यावर आज नाही तर गेल्या ४०-४५ वर्षांपासून पाठपुरावा, आंदोलन आणि दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवणे सुरू आहे. पण रेल्वे बोर्ड आणि मंत्र्यांना पाझर फुटत नाही.

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांच्या बाबतीत केंद्रातील प्रत्येक पक्षाच्या सरकार व मंत्र्यांनी अन्याय केला आहे. निवेदन, पत्राची भाषा सरकारला कळत नाही. त्यामुळे आता लोकांनी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करू, रेल्वे रोको करावा लागला तर तो देखील करू, असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT