पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उदयनराजे भोसले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उदयनराजे भोसले 
राज्य

`पंतप्रधान मोदी आणि उदयनराजेंची भेट 19 सप्टेंबरला होणार'

सरकारनामा ब्युरो

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांची येत्या 19 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये भेट होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी खास वेळ राखून ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मात्र, त्यासाठी पंतप्रधान मोदी आले नाहीत, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, की प्रोटोकॉलमुळे पंतप्रधानांना राजकीय प्रवेशाला उपस्थित राहता येत नाही. प्रवेशानंतर दुसऱ्या दिवशी भेटीसाठी या किंवा नाशिकला 19 सप्टेंबर रोजी एकत्र बसू असे पंतप्रधानांनी सांगितले होते. मात्र, महाजनादेश यात्रेमुळे दुसऱ्या दिवशी भेटणे शक्य नव्हते. त्यामुळे आता 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधांनांनी उदयनराजेंच्या भेटीसाठी खास वेळ राखून ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT