राशीन : ढोल-ताशांच्या गजरात आणि तोफांची सलामी देत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांचे शुक्रवारी राशीनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले . प्रकाश आंबेडकरांच्या स्वागताला रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.
ऍड.आंबेडकर हे समाजाची अस्मिता आणि नेते आहेत. यामध्ये आम्ही गट-तट मानीत नसल्याचे कार्यकर्ते सांगत होते . कार्यकर्ते, पदाधिकारी, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांना तोफांची सलामी देखील देण्यात आली .
ऍड.आंबेडकर हे अहल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी भिगवण येथून राशीन मार्गे चौंडी (ता.जामखेड) येथे चालले असताना कार्यकर्त्यांनी त्यांचे राशीनमध्ये पुष्पहार, फेटे, पंचे आणि नारळ देऊन स्वागत केले. आपल्या वाहनातच उभे राहून ऍड.आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांचे सत्कार स्वीकारत सर्वांना जय भीम केला.
या स्वागत समारंभासाठी राशीनच्या सरपंच निलम साळवे, माजी सरंपच रामकिसन साळवे, हनुमंत साळवे, अनिल साळवे, सोमनाथ कोल्हटकर, कौशल्या साळवे, मंगल ओहोळ, डॉ.देविदास साळवे, जावेद काझी, शरीफ काझी, धनराज साळवे, दिंगाबर कांबळे, सुभाष साळवे, भारत साळवे, राजेंद्र ढावरे, चंदर साळवे यांच्यासह स्थानिक तरूण कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
ऍड.प्रकाश आंबेडकर येणार असल्याने सकाळी साडेआठ वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौकात गर्दी केली होती. ऍड.आंबेडकर यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पावणे अकरा वाजता ऍड.आंबेडकर राशीन येथे येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.