देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस 
राज्य

सध्याचे सरकार `स्थगिती' सरकार - फडणवीस

सरकारनामा ब्युरो

पुणे - राज्यातील ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर केली. 

नागपूर येथे उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आज फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, की प्रत्येक गोष्टीला स्थगिती देण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ठप्प आहे. त्यातून असंतोष निर्माण झाला आहे. आढावा (रिव्ह्यू) जरुर घ्या. पण किती दिवसांत ? सध्याची स्थिती किती दिवस राहणार ?

स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. धोरणात सातत्य नसल्यास राज्यातील गुंतवणुकीवर परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT