3Pune_police_officials_quara.jpg
3Pune_police_officials_quara.jpg 
राज्य

पुण्यातील या आठ पोलिस अधिकाऱ्याना राष्ट्रपती पोलिस पदक 

सरकारनामा ब्युरो

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारकडुन देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. पुण्यातील आठ पोलिस अधिकाऱ्याना उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

 पुणे पोलिस दलातील परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुषमा चव्हाण, पोलिस उपअधिक्षक अनिल पाथरुडकर, रेल्वेच्या पुणे विभागातील पोलिस उपअधिक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाची सुनील यादव व राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ ग्रुप एक) असिस्टंट कमांडंट सादिकअली सय्यद यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहेत.

विशेष पोलीस पदकासाठी देशातील १२१ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. यात केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाचे १५, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील प्रत्येकी १०, उत्तर प्रदेशातील ८, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ अधिकारी कर्मचाऱ्यांसह उर्वरित अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकूण २१ महिलांचा समावेश आहे.

राज्यातील विशेष पोलीस पदकाचे मानकरी
१. शिवाजी पंडीतराव पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर )
२. राजेंद्र सिदराम बोकडे, पोलीस निरीक्षक
३. उत्तम दत्तात्रेय सोनवणे, पोलीस निरीक्षक
४. नरेंद्र कृष्णराव हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
५. ज्योती लक्ष्मण क्षिरसागर, पोलीस अधीक्षक
६. अनिल तुकाराम घेरडीकर, उप विभागीय पोलीस अधिकारी
७. नारायण देवदास शिरगावकर, उप पोलीस अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती)
८.समीर नाजीर शेख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा,नाशिक शहर)
९.किसन भगवान गवळी, सहायक पोलीस आयुक्त
१०.कोंडीराम रघु पोपेरे , पोलीस निरीक्षक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT