prithviraj chavan talks with ashwini through video call
prithviraj chavan talks with ashwini through video call 
राज्य

पृथ्वीराज चव्हाणांनी साधला चीनमधील आश्‍विनीशी संवाद

सरकारनामा ब्युरो

सातारा : चीन दुतावासांशी मी स्वत: संपर्क करतो, तुम्हाला ते स्पेशल केस म्हणून पासपोर्ट देतील. तसेच तुम्हाला भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्‍वासन पृथ्वीराज चव्हाण यांनी वुहानमधील आश्‍विनी पाटील यांना दिले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज वुहानमधील मुळची साताऱ्याची असलेल्या आश्‍विनीशी व्हिडीओ कॉलव्दारे संवाद साधला. पृथ्वीराज चव्हाण यांनी तिची आपुलकीने आत्मियतेने चौकशी केली. तीची वुहानमधील नेमकी अडचण जाणून घेतली. आश्‍विनाचा पासपोर्ट ब्रिटीश दुतावासात आडकला आहे. त्यामुळे तो मिळाला तर बऱ्यापैकी प्रश्‍न मार्गी लागणार आहे, असे तिने सांगितले. 

त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी मी तातडीने चीनच्या दुतावासाशी संपर्क करून तुम्हाला पासपोर्ट देण्याबाबत चर्चा करतो. तसेच स्पेशल केस म्हणून तुम्हाला पासपोर्ट देता येईल. यासाठी दुतासावातील लोकांना विचारून त्यांना मी तातडीने विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगत आम्ही तुम्हाला भारतात परत आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. आश्‍विनी तुम्हीा कोणतीही काळजी करू नका भारत देश तुमच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT