अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर पुढील अडीच वर्षे अनुसूचित जमातीची महिला उमेदवार विराजमान होणार आहे. यासाठी 3 जानेवारी 2020 रोजी निवडणूक होणार आहे. गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जमातीच्या महिलेला या पदावर विराजमान होण्याची संधी मिळणार आहे.
सत्ताधारी शेकाप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या आघाडीकडे या प्रवर्गातील तीन महिला सदस्य आहेत. त्यापैकी योगिता पारधी या तरुण आणि सुशिक्षित असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. या वेळी उपाध्यक्षांचीही निवड होणार आहे.
जिल्हा परिषदेतील शेकाप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या आघाडीने अध्यक्षपदासाठी पहिली अडीच वर्षे अदिती तटकरे यांना पसंती दिली होती. उर्वरित अडीच वर्षांसाठी शेकापच्या उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आरक्षणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आरक्षणानुसार अनुसूचित जमातीच्या महिलेला संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेत घडामोडींना वेग आला आहे.
आघाडीकडे या प्रवर्गातील तीन सदस्या आहेत. त्यामध्ये पनवेल तालुक्यातील वावंजे गटातून विजयी झालेल्या शेकाप योगिता पारधी, वडघर गटातील पदीबाई ठाकरे यांचा समावेश आहे; तर कर्जत तालुक्यातील नेरळ गटातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या अनसूया पादीर यांचा समावेश आहे.
सध्या जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी ऍड. आस्वाद पाटील आहेत. या वेळी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
जयंत पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीचे सर्व अधिकार शेकापने सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिल्याचे समजते; परंतु अध्यक्षपदाची माळ योगिता पारधी यांच्या गळ्यात पडण्याची अधिक शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.