danve-jaiswal news about midc news
danve-jaiswal news about midc news 
राज्य

दानवे-जैस्वालांच्या प्रयत्नानंतर आणखी दोन एमआयडीसी सुरू होणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबादः  शहरातील रेल्वेस्टेशन आणि चिकलठाणा यो दोन एमआयडीसीतील कारखाने देखील सुरू करण्यात येणार आहेत. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल यांनी तीन दिवसांपुर्वी महापालिकेचे प्रशासक आस्तीक कुमार पांडेय यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती. त्याला मान्यता देण्यात आली असून आजपासून या भागातील कारखाने, उद्योग सुरू करण्यासाठी रितसर परवानगी देण्यात येणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सागंतिले.

औरंगाबाद शहरात कोरोनाचे बाराशेहून अधिक रुग्ण आढळून आले, तर ४२ जण या महामारीने दगावले. त्यामुळे शहराचा समावेश हा राज्यातील रेडझोनमध्ये करण्यात आलेला आहे. गेल्या महिन्यात वाळूज आणि शेंद्रा एमआयडीसीतील बरेच कारखाने सुरू झाल्यामुळे काही प्रमाणात उद्योगांना चालना मिळाली. परंतु रेडझोनमध्ये असल्यामुळे रेल्वेस्टेशन आणि चिकलठाणा या दोन एमआयडीसींना सुरू करण्यास परवानगी नव्हती.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल यांनी दोन दिवसांपुर्वी महापालिका प्रशासक आस्तीक कुमार पांडेय यांची भेट घेऊन या दोन्ही एमआयडीसी सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. रेल्वेस्टेशन व चिकलठाणा या औद्योगिक वसाहती रेडझोन मध्ये येत असल्या तरी हा भाग कंटेनमेट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला नाही, किंवा या भागात कोरोनाचे रुग्ण देखील फारसे आढळलेले नाही.

त्यामुळे शासनाने घालून दिलेले, नियम, अटी, सुरक्षित अंतर राखत मास्क, सॅनिटायझरचा वापर करत या भागातील उद्योग, कारखाने सुरू करण्यास देखील परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही प्रशासकांकडे केली होती. या दोन्ही एमआयडीसी सुरू झाल्या तर हजारो कामगारांच्या हाताला काम मिळून शहरातील जो भाग कंटेनमेट झोनमध्ये नाही तिथे तरी किमान दळणवळण सुरू होईल. यामुळे प्रशासन, महापालिका आणि आरोग्य विभागवरील ताण हलका होण्यास देखील मदत होईल, हे आम्ही निदर्शनास आणून दिले.

आस्तीक कुमार पांडेय यांनी देखील याबाबत सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेऊन रेल्वेस्टेशन आणि चिकलठाणा एमआयडीसी सुरु करण्यासाठीची प्रक्रिया सुर करण्याचे आश्ववासन दिले होते. अखेर आज या बाबतचा निर्णय घेऊन, या दोन्ही औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, उद्योग सुरू करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानूसार आॅनलाईन अर्ज करणाऱ्यांना तात्काळ परवानी देण्यात येणार असल्याचेही अंबादास दानवे यांनी ‘सरकारनामा‘शी बोलतांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT