राज्य

एफआरपी थकवलेल्या साखर कारखानदारांना काकणभरही ऊस देणार नाही - राजू शेट्टी

सरकारनामा ब्युरो

सोलापूर - सोलापूरमध्ये स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मागच्या वर्षी शेतकऱ्यांचा एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखानदारांना काकणभरही ऊस देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका बळीराजाला बसलाय, त्या पिकांचा पाहणी दौऱ्यासाठी राजू शेट्टी सोलापूरला होते, दरम्यान या संदर्भात सोलापूरमधील शासकीय विश्राम गृहामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.

याबाबत साखर आयुक्तांनी एफआरपी थकबाकीदार कारखानदारांना गाळपाचे परवाने देऊ नये, अशी विनंती ते साखर आयुक्तांना करणार आहेत. मात्र तरी सुद्धा परवाने दिले गेले तर कायदा हातात घेऊन कारखाने बंद पडण्याचा इशारा ही राजू शेट्टींनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT