राज्य

विधवा, अंध शेतकऱ्याला रमेश आडसकर घर बांधून देणार

सरकारनामा ब्युरो

बीड : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच एका अंध शेतकऱ्याला आणि विधवेला पावसाने पडलेले घर बांधून देण्याची घोषणा भाजप नेते रमेश आडसकर यांनी केली. पीक नुकसानीची पाहणी करत असतानाच मुसळधार पावसाने घर पडलेल्या हरिश्चंद्र पिंप्री येथील गंगाबाईला आश्रु अनावर झाले आणि तत्काळ आडसकर यांनी ही घोषणा केली.

श्री. आडसकर यांनी रविवारी तालुक्यातील हिवरगव्हाण, पुसरा, चिंचाळा, देवडी, मोरेवाडी, कवडगाव, परडी, माटेगाव, लवुळ आदीसह विविध गावांत जाऊन परतीच्या पावसाने झालेल्या पीकांच्या नुकसानी पाहणी केली.

राजा हरिश्चंद्र पिंपरी येथील विधवा गंगाबाई व देवगाव  देवगाव येथील अंध शेतकरी यांचे राहते घरे उध्दवस्त झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले होते. पीक नुकसानीची पाहणी करत असतानाच या दोघांच्या व्यथा ऐकून रमेश आडसकरांनी घर बांधून देण्याची घोषणा केली. भाजपा तालुकाध्यक्ष राम सावंत, बाजार समितीचे संचालक गोविंद मस्के, मच्छिंद्र झाटे,पोपट शेंडगे, बालासाहेब बादाडे सह शेतकरी उपस्थित होते.

पीक विमा देखील शंभर टक्के द्यावा : रमेश आडसकर
पीक नुकसानीसाठी पिक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार आहे. परतीच्या पावसाने पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याने विमा देखील शंभर टक्के भेटावा, अशी मागणी रमेश आडसकर यांनी केली. प्रशासनाने गाव पातळीवर प्रत्यक्ष मदत पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, आजपर्यंत विमा कंपनीने कोणताही पंचनामा केल्याचे निदर्शनास येत नाही. त्यांनीही गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी रमेश आडसकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT