राज्य

अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची स्वच्छता मोहिम

सरकारनामा ब्युरो

अकोला : "स्वच्छतेतून समृद्धीकडे' हा मंत्र जपत शहर विकासाच्या कामासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सक्रीय पुढाकार घेतला आहे. आज 
नवीन बस स्थानक - इराणी झोपडपट्टी परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभागी होत डॉ. पाटील यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक कदम स्वच्छता की ओर' या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वात स्वच्छतेची व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. अकोला जिल्हा व शहरातही या अभियानाची मोठ्या प्रमाणात प्रचार करून लोकसहभागातुन स्वच्छता अभिमान राबविण्यात येत आहे. 

पालकमंत्री रणजित पाटील, महापालिका आयुक्त अजय लहाणे, नगरसेवक हरिष आलिमचंदानी, नगरसेवक अजय शर्मा आदींनी इरानी झोपडपट्टी परिसरात जात हातात झाडू घेत स्वच्छता केली. यावेळी पालकमंत्र्यांनी परिसरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. निरोगी जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधानांनी गेल्या तीन वर्षात स्वच्छ भारताचा संदेश दिला. स्वच्छता हीच सेवा ही मोहिम 2 ऑक्‍टोबर पर्यंत राबविण्याचे त्यांनी सूचित केल्यानंतर राज्य शासनाने ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्याचे निश्‍चित केले. 

अकोला जिल्हा स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेचा संकल्प करणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियानाच्या या चळवळीत सहभागी होऊन आपल्या घराप्रमाणेच आपला परिसर, आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन यावेळी डॉ. पाटील यांनी या अभियानात सहभागी होताना केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT