State Home Minister Dilip Walse Patil Press News Aurangabad 
राज्य

मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित गुन्हेही लवकरच मागे घेणार..

सर्वसामान्य माणसाला पोलिस ठाण्यात आदराची वागणूक मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

सुषेन जाधव

औरंगाबाद :  येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्यभरात ५ हजार जागांची पोलिस भरती झालेली असेल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (ता.१२) औरंगाबादेत दिली.  शहर पोलिस दल तसेच औरंगाबाद परिक्षेत्राच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (The remaining crimes in the Maratha reservation movement will also be withdrawn soon.) या पदभरतीनंतरही ७ हजार पोलिसांची पुन्हा नव्याने भरती करणार असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल काही गुन्हे मागे घेतलेले आहेत. आता उर्वरित गुन्हेही मागे घेतले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्था, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, तसेच दाखल झाल्यानंतर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण आदींचा आढावा घेतला. (State Home Minister Dilip Walse Patil) वाझे प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी वनमंत्री संजय राठोड आदि प्रकरणानंतर पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात  आला.

यावर बोलतांना सर्वसामान्य माणसाला पोलिस ठाण्यात आदराची वागणूक मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, तशा सक्त सूचनाही संबंधितांना दिल्याचे पाटील म्हणाले. यावेळी पोलिस महांचालक संजय पांडे, आयुक्त डॉ. निखील गुप्ता, आयजी एम. प्रसन्ना, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

आर्थिक, सायबर गुन्ह्यात वाढ

आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून प्रभावी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिलांची बदनामी होत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणे, गावात संघर्ष निर्माण होण्यासारख्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी ग्रामीण पोलिसांनी भर दिल्याचे सांगत त्यांनी कौतुकही केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या (कोरोना योद्धा) अनुकंपा भरतीबद्दल सरकारचे धोरण सुस्पष्ट असून हा निर्णय आयुक्त स्तरावर, पोलिस अधीक्षक स्तरावर होईल.  

या कोरोना योध्यांच्या वारसांना ५० लाख रुपये दिले असून प्रलंबित प्रस्तावही लवकरच मार्गी लावण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.  पोलिसांना चांगले कार्यालय, घर मिळावे यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही गृहमंत्री म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT