Maharashtra Chitrarath
Maharashtra Chitrarath  Sarkarnama
राज्य

`प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवनागी नाकारली ही अफवाच`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day Parade) दिल्लीतील राजपथावर (Rajpath) होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारकडून (Central Government) परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत होती. याबाबत काही बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, या बातम्या तथ्यहीन आणि खोडसाळपणा असल्याची माहिती सांस्कृतिक विभागाच्या संचालकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणावरून महाराष्ट्राच्या चित्ररथाची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती ही चुकीची असून अफवा होती. हे स्पष्ट झाले आहे.

सांस्कृतिक विभागाच्या संचालकाने याबाबत सांगितले की, महाराष्ट्राचा चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली याबाबतच्या प्रसारीत होत असलेल्या बातम्या तथ्यहीन आहेत. चित्ररथाचे काम व्यवस्थित सुरू आहे. यंदा महाराष्ट्राची जैवविविध मानके ही थीम असून नेहमीप्रमाणे चित्ररथाचे सिलेक्शन डिसेंबर महिन्यातच झाले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह केरळ, पश्चिम बंगाल व बिहारच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. याबाबत शीख फॅार जस्टीस या संघटनेने प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा रस्ता अडवण्याची धमकी देण्यात आल्याचे कारण सांगत २६ जानेवारीला मोदींना राजपथावर जाऊ देणार नाही. तसेच, इंडिया गेटवर जाण्यापासूनही त्यांना रोखले जाईल, असा इशारा या संघटनेने दिल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनाही या संघटनेकडून इशारा देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या बातम्यामध्ये काही तथ्य नसून हा खोडसाळपणा असल्याचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, २६ जानेवारीला दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची जैवविविध मानके ही थीम असणार आहे. राज्याच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोनदा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.

२०१५ साली 'पंढरीची वारी' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला होता. यास चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तर, २०१८ रोजी 'शिवराज्याभिषेक' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी १९८० मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली 'बैलपोळा' या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT