RRC action against Khandala sugar and kisan veer sugar factory
RRC action against Khandala sugar and kisan veer sugar factory 
राज्य

किसन वीर, खंडाळा कारखान्याला जप्तीची नोटीस; साखर आयुक्तांची कारवाई

सरकारनामा ब्यूरो

सातारा : गळीत हंगाम 2021 मधील शेतकऱ्यांची एफआरपीनुसार असलेली देणी थकविल्याप्रकरणी किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यास साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीची (आरआरसीची) नोटीस बजावली आहे. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली असून, त्यामध्ये कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची थकीत भागविण्यात यावीत, असे म्हटले आहे. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्यातील 188 साखर कारखान्यांनी गळीत केले. त्यापैकी 87 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर 101 कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीनुसार होणारी रक्कम थकविलेली आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांवर एफआरपी कायद्यानुसार कारवाई केली जाते. 

त्यानुसार साखर आयुक्तांनी राज्यातील 19 साखर कारखान्यांना आरआरसीची नोटीस बजावली आहे. यामध्ये किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना (भुईंज) व किसन वीर खंडाळा साखर कारखान्याचा समावेश आहे. किसन वीर कारखान्याने मार्च 2021 पर्यंतची चार कोटी 90 लाख 45 हजार रुपयांची एफआरपी थकविली आहे. 

तर खंडाळा कारखान्याकडे 76 कोटी 18 लाख 70 हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकीत रक्कम कारखान्यांची मालमत्तेची विक्री करून त्यातून येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची थकीत देणी भागवावी, असे नोटिशीत म्हटले आहे. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. आता जिल्हाधिकारी यावर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT