SHARAD_PAWAR_BALASAHEB_THAKARE.
SHARAD_PAWAR_BALASAHEB_THAKARE. 
राज्य

बाळासाहेब असते तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते :  शरद पवार

जगदीश पानसरे

औरंगाबादः महात्मा गांधी मिशनचा हा परिसर हिरवागार ठेवत येथील पर्यावरण राखण्यासाठी अंकुशराव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पण महापालिकेने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी येथील उद्यानातील चारशे झाडं तोडल्याचे मला कळाले. 


आज बाळासाहेब असते तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी महापालिकेला सुनावले. बाळासाहेब माझे चांगले मित्र होते, मला त्यांचा स्वभाव माहित आहे, त्यांचे स्मारक नक्कीच झाले पाहिजे, ते सांभाळण्याची जबादारी तुम्ही एमजीएम व बाबुराव कदमांवर सोपवा असा सल्ला देखील पवारांनी यावेळी दिला.

महात्मा गांधी मिशनचे विश्‍वस्त अंकुशराव उर्फ बाबुराव कदम यांचा अमृत महोत्सव सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी शिक्षण-सेवा-संशोधन या मार्गावर एमजीएमची यशस्वी वाटचाल सुरू असून अंकुशराव कदम यांनी त्याचे तंतोतंत पालन केल्याचे गौवरवोद्दगार पवारांनी काढले.

माजीमंत्री कमल किशोर कदम यांनी आपल्या भाषणात एमजीएम कॅम्पसमधील उद्यानातील चारशे झाडे तोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. याचा संदर्भ देत शरद पवारांनी देखील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर  नंदकुमार घोडेले यांच्यासमोरच महापालिकेचे कान टोचले. शरद पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी या परिसरातील चारशे झाडे तोडल्याचे मला कळाले. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते.

बाळासाहेबांना मी चांगल ओळखतो, ते माझे मित्र होते, स्मारकासाठी झाडे तोडण्याचे त्यांना कधीच आवडले नसते. बाळासाहेबांचे स्मारक झाले पाहिजे, उलट हे स्मारक आणि उद्यान एमजीएमकडे सोपवा. बाबुराव येथील पर्यावरण निश्‍चितच राखतील. शिवाय अनेक लोक हे स्मारक पहायला इथे येतील असेही शरद पवारांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT