Shivsena declear sampark mantri news
Shivsena declear sampark mantri news 
राज्य

शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर, जालन्याची जबाबदारी देसाईंकडे, तर बीड, लातूरला भुमरे..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन वर्ष होत आले असतांना अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे संपर्कमंत्री नव्हते. संघटन वाढ आणि त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपले प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करता यावा, यासाठी शिवसेनेत संपर्कमंत्री नेमले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून काही जिल्ह्यांमध्ये अशी नेमणूक करण्यात आलेली नव्हती. आता राज्यात सत्ता आणि शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असल्याने उशीरा का होईना, संपर्कमंत्री जाहीर करण्यात आले आहेत. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे शेजारच्या जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर बीड, लातूर जिल्ह्याची जबादारी साेपवण्यात आली आहे.

गेली पाच वर्ष शिवसेना भाजप सोबत राज्याच्या सत्तेत होती. पण सत्तेत असूनही शिवसेना नेहमीच विरोधकांच्या भूमिकेत राहिली. सत्ता असून देखील त्याचा फारसा उपयोग संघटना वाढीसाठी किंवा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे करण्यााठी फारसा झाला नव्हता. २०१९ मध्ये पुन्हा शिवसेना भाजपसोबत लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढले. पण राज्यात जेव्हा सत्ता स्थापनेच्य हालचाली सुरू झाल्या, तेव्हा वेगळेच समीकरण उदयाला आले, आणि ५५ आमदारांच्या जोरावर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

शिवसेना- राष्ट्रवादी- काॅंग्रेस अशा तीन पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी प्रत्येक पक्ष आपापल्या पक्ष वाढीसाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करतांना दिसत आहे. शिवाय राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या देखील अद्याप करण्यत आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर तीन्ही पक्षांनी आपापल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या शिवाय पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्याची कामे करता यावीत यासाठी संपर्कनेते, संपर्कंप्रमुख अशी रचना शिवसेनेत आहे.

परंतु राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही पदे रिक्त होती. राज्यात सत्ता असल्यामुळे आणि मंत्रीमंडळात विविध खात्यांची जबाबदारी अनेकांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधित किंवा राज्याच्या आखत्यारित असलेल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने संपर्कमंत्र्यांची नेमणूक आवश्यक होती. त्यादृष्टीने शिवसेनेने संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. मराठवाड्याचा विचार केल्यास जालना जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून  सुभाष देसाई, बीड- संदीपान भुमरे, नांदेड- संजय राठोड, हिंगोली-परभणी, शंभुराज देसाई यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यातील संपर्कमंत्री असे..

आदित्य ठाकरे - मुंबई शहर

सुभाष देसाई- जालना

एकनाथ शिंदे - चंद्रपुर, गोंदिया

उदय सामंत- कोल्हापूर-सातारा

दादा भुसे- नाशिक, नगर

गुलाबराव पाटील- बुलडाणा, अमरावती

अनिल परब- पुणे, रायगड

शंकराराव गडाख- सोलापूर- सांगली

संजय राठोड- नांदेड, भंडारा, नागपूर

अब्दुल सत्तार- नंदुरबार,  वर्धा

शंभुराज देसाई- हिंगोली, परभणी

संदीपान भुमरे- बीड, लातूर

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT