Mangesh Kadao
Mangesh Kadao 
राज्य

शिवसेनेचा निलंबित शहरप्रमुख खंडणीबाज मंगेशच्या पत्नीला अटक

सरकारनामा ब्युरो

नागपूर : शिवसेनेचा निलंबित करण्यात आलेला खंडणीबाज शहरप्रमुख मंगेश कडव याने शिवसेना पक्ष निधीच्या नावाखाली कोट्यवधीची माया कमावलेली आहे. लाखो रूपये मंगेशने पत्नी रूचिता व तिच्या नातेवाईकांना दिले होते. रूचिताच्या नावावर विक्री केलेल्या फ्लॅटची रजिस्ट्रीसुद्धा केली होती. सोमवारी गुन्हे शाखा पोलिसांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याची पत्नी रुचिता मंगेश कडव हिला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याभरापूर्वी मंगेश कडववर 25 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला. तेव्हापासून कडव चर्चेत आला होता. सोमवारी एका तरुणाला रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पाचवा गुन्हा सीताबर्डी ठाण्यात दाखल करण्यात आला. दुसरीकडे सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. त्याच्या मालकीच्या दोन मर्सिडिज कार व एक हार्ले डेव्हीडसन दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

रूचिताचे नाटक, पोलिसांचा हिसका 
मंगेशची पत्नी रुचिता ही छातीत दुखण्याचे निमित्त करून सदरमधील व्हीम्स रुग्णालयात दाखल झाली होती. सोमवारी दुपारी सुटी होऊन ती रुग्णालयाबाहेर पडताच गुन्हे शाखेच्या महिला पथकाने तिला घेरले. त्यावेळी तिने महानाट्य केले. मात्र, महिला पोलिसांनी हिसका दाखवताच चुपचाप पोलिस वाहनात बसली, असे सांगण्यात आले. मंगेश कडव अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT