Sanjay Raut Taunts Devendra Fadanavis at Nashik
Sanjay Raut Taunts Devendra Fadanavis at Nashik 
राज्य

खरी मजा विरोधी पक्षातच असते : संजय राऊतांचा फडणवीसांना उद्देशून चिमटा

सरकारनामा ब्युरो

नाशिक : ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार पाच वर्षे चालेलच. त्या नंतरची पंचवीस वर्षे आम्हाला हे सरकार चालवायचे असुन महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे व सर्वोत्तम राज्य बनवायचे आहे,'' असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

येथील जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपुजन आज ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार संजय राऊत प्रमुख पाहुणे होते. यावेळी ते म्हणाले, ''सरकार स्थापन होण्यापूर्वी आम्ही प्रखर भूमिका पार पाडत असतो. एकदा सरकार स्थापन झाले की, आम्ही बाजुला होतो. विरोधी पक्ष होतो. खरी मजा विरोधी पक्षातच असते.''

देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळून ते म्हणाले, "सध्याच्या विरोधी पक्षनेत्यांनाही हे सांगितले पाहिजे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून चांगले काम होईल. सरकार व विरोधी पक्ष एकत्रीतपणे राज्याच्या हितासाठी काम करतील. त्यानंतर खरी मजा येईल.''

यापुढील नाशिकच्या सर्व प्रमुख कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. छगन भुजबळ यांच्यावर ती जबाबदारी सोपवा. कारण यापुढे पाच वर्षे सध्याचे राज्यातील सरकार चालणार आहे. त्यात काहीही अडचण नाही. या पाच वर्षात उत्तम काम करायचे आहे. सरकार कोणते यापेक्षा त्याने जनतेसाठी कोणत्या योजना आखल्या, हे अधिक महत्वाचे असते. जनतेसाठी त्यांनी काय कामे केली याला अधिक महत्व असते.'' असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT