Chagan Bhujbal
Chagan Bhujbal 
राज्य

"त्या' डीएसओंना कारणे दाखवा, छगन भुजबळांनी दिले होते निलंबनाचे आदेश 

निलेश डोये

नागपूर : निकृष्ट धान्य पुरवठाप्रकरणी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दोन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सचिवांनी दोन्ही अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली. या प्रकरणी नाशिकचे अधिकारीही अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

नाशिक येथे तपासणीदरम्यान अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तांदूळ निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. संताप व्यक्त करीत त्यांनी तांदूळ पुरवठा केलेल्या गडचिरोली आणि नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दोषी धरत निलंबनाचे आदेश दिले होते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अधिकारी, कर्मचारी संघटनेने निलंबनाच्या कारवाईला विरोध दर्शवित प्रथम चौकशी करण्याची मागणी केली होती. अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांनी संघटनेची मागणी मान्य करीत न्यायभूमिकेने थेट निलंबन करता प्रथम चौकशीचे आदेश दिले. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीवरून तांदूळ नागपूरच्या एफसीआय गोदामात आणला गेला. येथून नाशिकला हा तांदूळ रवाना झाला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तांदूळ रवाना करताना संबंधित जिल्ह्यांमधील, विभागातील अधिकारी उपस्थित असतात. नागपूरवरून नाशीकला तांदूळ पाठविताना तेथील अधिकारी हजर होते. शिवाय त्यांच्याकडून व पुरवठा अधिकाऱ्यांकडून मालाची तपासणी होणे आवश्‍यक आहे. माल निकृष्ट असल्यास तात्काळ त्याची नोंद करणे आवश्‍यक आहे. नाशिकच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या बजावले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नाशिकचे अधिकारीही या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT