Sindhudurg's journey towards complete lockdown
Sindhudurg's journey towards complete lockdown 
राज्य

सिंधुदुर्गाची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनकडे...

सरकारनामा ब्यूरो

कणकवली : कोकणाला तौक्ते चक्रीवादळाने आणि सध्याच्या पावसाने हैराण केले असतानाच कोरोना संक्रमणही नियंत्रणाबाहेर चालले आहे. कोरोनाची लागण आणि मृत्यूदरात सातत्याने वाढ सुरू असल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांची संपूर्ण लॅाकडॉउनच्या Corona Lockdown दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. Sindhudurg's journey towards complete lockdown

सिंधुदुर्गात दररोज सरासरी ६०० कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेतही वाढ झाली आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या आठवड्यात पॉझिटिव्ह दर खाली न आल्यास संपूर्ण लॉकडाउनची टांगती तलवार आहे. सध्या कणकवली आणि या तालुक्यातील काही गाव हे हॉटस्पॉट बनू लागली आहेत. 

राज्याच्या एकूण पॉझिटिव्ह दरांमध्ये सातत्याने घसरण होत असली तरी कोकणातील या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह संख्या नियंत्रणात येऊ शकलेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जोर धरला आहे. आगामी काळातील सार्वजनिक उत्सव लक्षात घेता कोरोनाचे नियंत्रण पुढच्या महिन्याभरात होणे आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT