... so ministers will not be allowed to roam the streets; Rayat Kranti Sanghatana Aggressive
... so ministers will not be allowed to roam the streets; Rayat Kranti Sanghatana Aggressive 
राज्य

...तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही; रयत क्रांती संघटना आक्रमक 

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : महावितरकडून सक्तीने वीजबिल वसुली सुरू आहे. त्याचबरोबर शेतीपंप व घरगुती वीज जोडणी खंडित करण्याचीही मोहिम सुरू आहे. सरकारने कर्जमाफी, वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आज श्री. नलवडे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना दिले.

सचिन नलवडे यांच्यासह कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रल्हाद पाटील, अनिल डुबल, चंद्रकांत शेलार, अधिक कदम, तुकाराम खोचरे, वसंतराव धोकटे, सुरेश खोचरे, अजित पाटील, अशोक पाटील, सुभाष नलवड़े, सज्जन माने, सुभाष शिंदे, नागराज शिंदे आदींच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

निवेदनात रयत क्रांती संघटनेने म्हटले की, लॉकडाउन व अतिवृष्टीमधील संपूर्ण वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांना रिडिंगप्रमाणे बिले न देता सरासरीने भरमसाट वीजबिले दिली आहेत. ती दुरुस्त करावी. थकीत बिलाचे संपूर्ण व्याज व दंडाची रक्कम विनाअट रद्द करावी. शेतीसह घरगुती वीज पुरवठा खंडित केला. तर रयत क्रांती संघटना सरकारच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही इशारा देण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT