राष्ट्रवादी म्हणते, उदयनराजे आमचेच ! 
राष्ट्रवादी म्हणते, उदयनराजे आमचेच !  
राज्य

राष्ट्रवादी म्हणते, उदयनराजे आमचेच ! 

सरकारनामा ब्युरो

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने बाजूला ठेवण्याचा प्रश्‍नच नाही. ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्याबाबत काय घडले, ते मला माहीत नाही. 11 जूनपासून होणाऱ्या जिल्हानिहाय दौऱ्यांत याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. 

पक्षाचे खासदार असूनही उदयनराजे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांना बाजूला ठेवले आहे. त्यांच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल झाला आहे. पक्षीय पातळीवर त्यांच्याबाबत कोणती कारवाई झाली आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले, ""उदयनराजेंना बाजूला ठेवण्याचा प्रश्‍नच येत नाही. ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. पक्ष व संघटनेशी संबंधित निर्णय घेताना होणाऱ्या बैठकींना ते उपस्थित असतात. मध्यंतरी एका बैठकीला ते नव्हते. इतरवेळी ते उपस्थित होते; पण त्यांच्यावरील गुन्ह्यासंदर्भात मला माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याविषयी मी अधिक भाष्य करू शकत नाही. 11 जूनला होणाऱ्या जिल्हानिहाय दौऱ्यावेळी आम्ही सर्व माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT