Navnit Rana Jallosh
Navnit Rana Jallosh 
राज्य

खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; अमरावतीत जल्लोश

अरूण जोशी

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navnit Rana यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविली असल्याचा आरोप करीत माजी खासदार आनंदराव अडसूळ Former MP Anandrao Adsul यांनी खासदार राणा यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन खासदार राणांना दिलासा दिला आहे. supreme court reassures mp navnit rana.

मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणावर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देऊन खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देताच युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात एकच जल्लोष केला. ढोल ताशे आणि फटाके फोडून आणि एकमेकांना लाडू खाऊ घालून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून निवडणूक लढविल्याचा खटला दखल केला होता. त्यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिल्याने पुढील निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती. तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती. यामधील २०१७ च्या याचिकेवर निकाल देत खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT