राज्य

भाजप-सेनेच्या आमदारांना अडवून त्यांचे राजीनामे घ्या : आमदार भालके

आदम पठाण

वडापुरी : गोरगरीबांच्या टपऱया बंद करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या आमदारांना रस्त्यावर अडवून त्यांचे राजीनामे घ्या, असा सल्ला पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी इंदापूर येथे दिला.

गेल्या तीन दिवसापासून इंदापूर तहसीलदार कार्यालयापुढे सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आमदार भारत भालके यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. 

भालके म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत कुठेही नमुद केलेले नाही की बावन्न टक्के पेक्षा जास्त आरक्षण देऊ नये. तरी आरक्षणाची टक्केवारी वाढवली जात नाही. मराठा समाजाने कायदा हातात कायदा घेतला खरे. पण या गोष्टीला सरकार जबाबदार आहे. काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी औरंगाबादचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना पत्र दिले होते. तरी देखील सरकारने आपत्ती निवारण व्यवस्था केलेली नाही.  चार तरूण शिंदे यांना वाचवण्यासाठी नदीत उडया मारत असताना पोलिसांनी त्यांना अडविले म्हणून लोकांनी कायदा हातात घेतला आहे. 

राज्यातील आज अखेर 25 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेस पक्षाने 30 जुलैला मुंबईत आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. त्यानंतर आम्ही सर्व आमदार राजीनामा देण्याचा नमुना फाॅर्मवर राजीनामे विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे यांच्याकडे समक्ष देणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. त्याऐवजी तीन दिवसांचे विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT