police logo 
राज्य

राज्यातील 10 हजार हवालदार होणार पीएसआय 

गेल्या सात वर्षांपासून पदोन्नतीच्या आशेवर बसलेले जवळपास 10 हजार पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच वर्दीमध्ये खांद्यावर "दोन स्टार' लागणार आहेत. पोलिस महासंचालकाच्या या निर्णयामुळे अनेकांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

अनिल कांबळे

नागपूर : राज्यातील 10 हजार पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. 2013 अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस हवालदारांना पीएसआय पदोन्नतीवर निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या हवालदारांना न्याय मिळणार आहे. 10 हजार पोलिस हवालदारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम "सरकारनामा'ने केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आस्थापना शाखेचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल यांच्या अध्यक्षेतखाली 2013 अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस हवालदारांच्या पदोन्नतीवर निर्णय घेण्यासाठी विशेष विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान (आस्थापना), अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त एस. जयकुमार आणि ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या विभागीय पदोन्नती समितीची बैठक राज्य पोलिस मुख्यालयात 15 जुलै रोजी चार वाजता झाली. 

या बैठकीत अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस हवालदारांना पीएसआय पदावर पदोन्नती देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल आता पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालकांच्या संमतीने लवकरच पीएसआय पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी पोलिस कुटुंब संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश नागोलकर यांनीही गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पदोन्नतीसंदर्भात निवेदन दिले होते. त्यांच्याही लढ्याला आता यश आले आहे. 

राज्यभरात आनंदाची लहर 
गेल्या सात वर्षांपासून पदोन्नतीच्या आशेवर बसलेले जवळपास 10 हजार पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच वर्दीमध्ये खांद्यावर "दोन स्टार' लागणार आहेत. पोलिस महासंचालकाच्या या निर्णयामुळे अनेकांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

"सरकारनामा'ने केला पाठपुरावा 
राज्यभरातील जवळपास 10 हजार पोलिस हवालदारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम "सरकारनामा'ने केले. 2013 अर्हता परीक्षा उत्तीण पोलिसांना पदोन्नती देण्याबाबत "सरकारनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. गृहमंत्रालयाने वृत्तमालिकेची दखल घेतली. पदोन्नती देण्याबाबत विभागीय समिती स्थापन करून अहवालाअंती पदोन्नतीवर निर्णय घेण्यात येणार आहे.    (Edited By : Atul Mehere)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT