thackeray government grants fund to modernise madrasa
thackeray government grants fund to modernise madrasa 
राज्य

राज्यातील मदरशांना ठाकरे सरकारकडून निधी 

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : सोलापूरसह मुंबई उपनगर, बुलढाणा, नांदेड, नगर, उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर येथील 44 मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी ठाकरे सरकारने एक कोटी 47 लाख 50 हजारांचा निधी दिला आहे. प्राप्त निधी आगामी तीन महिन्यांत ठरलेल्या कामांवरच खर्च करावा, असे निर्देशही दिले आहेत. 

मदरशांमधील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र व भाषा विषयांचे शिक्षण देणे, शाळा, महाविद्यालयांसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिखण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जेणेकरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल यादृष्टीने मदशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून हा निधी देण्यात आला आहे.

तसेच मदरशांमधील विविध कामे करणे, ग्रंथालयांसह शिक्षकांना अनुदान देणे अशी कामे त्या निधीतून केली जातात. 2019-20 साठी राज्य सरकारने आठ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून दिड कोटी रुपये देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने 18 फेब्रुवारीला घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा निधी संबंधित मदरशांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामध्ये सोलापुरातील पाच, मुंबई उपनगरातील दोन, नगरमधील एक, बुलढाण्यातील सहा, यवतमाळमधील तीन, नांदेडमधील सर्वाधिक 13, उस्मानाबादमधील आठ मदरशांचा समावेश आहे. 

सरकारच्या सूचना 
- मंजूर झालेला निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मदरशांच्या खात्यावर वितरीत करावा 
- ठरलेल्या कामांवरच निधी खर्च करावा : तीन महिन्यात कामे पूर्ण करावीत 
- मदरशांनी कामे पूर्ण केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना कामांचा अहवाल सादर करावा 
- जिल्हाधिकाऱ्यांनी मदरशांकडून प्राप्त झालेला अहवाल शासनाला तत्काळ द्यावा 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT