Sudhir Mungantiwar - Raj Thackeray
Sudhir Mungantiwar - Raj Thackeray 
राज्य

...तर होऊ शकते मनसेसोबत युती : सुधीर मुनगंटीवार

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : युती सत्तेसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, युती जनतेच्या हितासाठी असली पाहिजे. कोणत्या पक्षाची युती कोणत्या पक्षासोबत होईल, हे कुणाही सांगू शकत नाही. तर हे फक्त वेळच सांगू शकतो. भविष्यात भाजप आणि मनसेची विचारधारा जुळली, तर ही युती होऊ शकते, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार Former finance minister MLA Sudhir Mungantiwar आज म्हणाले. 

मुनगंटीवार म्हणाले, आजच्या तारखेत तरी मनसेसोबत युतीचा विषय आमच्या विचारात नाही. राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाली.  त्यामध्ये गैर काहीच नाही, येथे कुणी कुणाचा शत्रू नाहीये. मलासुद्धा राज ठाकरेंचा फोन आला होता. मीसुद्धा येत्या ८ दिवसांत त्यांची भेट घेणार आहे. त्यांना आठवण आली त्यांनी फोन केला. भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली, मी भेटेन. यामध्ये राजकारणच असले पाहिजे, असे काहीच नाही. पण भविष्यात जर मोदींच्या विचारांशी दुसरा कोणता पक्ष सहमत झाला. तर युती होऊ शकते. मग तो पक्ष मनसेही असू शकतो. 

उद्या मनसे आणि भाजप यांच्या विचारांमध्ये एकवाक्यता असेल, एकच सूर असेल तर युती होण्यामध्ये कुठलीही अडचण नाही. मात्र आज तरी असा कुठलाही विषय आमच्या कोअर टीममध्ये किंवा आमच्या चर्चेत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती भारतीय जनता पक्षासोबत यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये झाली होती. तेव्हाही विकास आणि जनतेची कामे, हाच अजेंडा होता. भविष्यात तशी परिस्थिती उद्भवली तर राज्यासाठीही तो विचार होऊ शकतो. पण हे आपण ठरवू शकत नाही, तर ती वेळच ठरवते, असे मुनगंटीवार म्हणाले. 

तर ईश्‍वराने त्यांना नेहमी सायकलवरच ठेवावे...
खोटं बोलण्याचा कोणता पुरस्कार दिला जात असेल, तर तो महाविकास आघाडीला दिला गेला पाहिजे. केंद्राने पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करावे म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील नेते सायकल चालवीत आंदोलन करतात, हे ढोंग आहे. पेट्रोल, डिझेलवर केंद्राचा जो टॅक्स आहे तो ३२.९० रुपये आहे. यामध्येसुदधा कोणता खर्च कोणत्या कामांसाठी होतो, हे केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे. केंद्रा‍तकाच  कर राज्य सरकार घेते आहे. २६ टक्के वॅट घेते आहे. पेट्रोलचे दर वाढले की राज्य सरकारची तिजोरी भरत जाते. कारण रस्त्यांसाठी पुन्हा १० ते १२ रुपये कर राज्य सरकार आकारते. त्यामुळे सायकल चालवून नाटकं करणाऱ्यांना ईश्‍वराने नेहमीसाठी सायकलवरच ठेवावे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT