mla meghna bordikar letter to cm news
mla meghna bordikar letter to cm news 
राज्य

एमपीएससीचा निकाल देतांना युपीएससी प्रमाणे प्रतिक्षा यादी असावी..

सरकारनामा ब्युरो


परभणीः  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल देतांना केंद्रीय परीक्षा आयोगा सारखी प्रतिक्षा यादी असावी, अशी मागणी जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

देशासह राज्यात आज घडीला रोजगार प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे युवक मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पाहतात. अनेकजण  स्वतःचे सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनेक स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या स्पर्धा परीक्षा विविध सरकारी विभागांमधील रिक्त जागा भरण्यासाठी होत असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोत असते. परंतू निवड गुणवत्तेच्या आधारावर बोटावर मोजण्या इतक्याचींच होते.

काही विद्यार्थी पूर्वी निवड झालेले असतात, पद सुधारणा करण्यासाठी ते पुन्हा परीक्षा देतात. त्यांना यश अपयश मिळते, त्याचा परिणाम इतर १०-१५ विद्यार्थ्यांवर तर नक्कीच होतो. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल देतांना केद्रीय परीक्षा आयोगा सारखी प्रतिक्षा यादी असावी, असे मेघना बोर्डीकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच सर्व प्रकारची शासकीय पदे लोकसेवा आयोगाद्वारेच भरण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकारी मंडळात सदस्यांच्या रिक्त जागा नसाव्यात, वर्ग-१ ते वर्ग -४ पदे रिक्त जागा व त्या भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, आपले विद्यार्थी आपल्या महाराष्ट्र राज्याची सेवा प्रसंगी ६-महिने,१ वर्षाकरिता बिनपगारी करतील पण, नोकरभरती बंद करु नये, अशी विनंती देखील मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT