uddhav thackray
uddhav thackray  
राज्य

तीन वेळा माफी मागून उद्धव ठाकरेंनी दाखवला मनाचा उमदेपणा 

सरकारनामा

नागपूर  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या काळात  विधानसभेत तीनदा माफी मागितली. मुख्यमंत्री पदावर असतानाही पदाचा  बडेजाव न ठेवता माफी मागण्यात त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला अशी चर्चा  आमदारात  रंगली. 

विरोधी पक्ष नेत्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे विधानसभेत पोहोचले होते . भाषणात विरोधी पक्ष नेत्यांनी ठाकरे याच्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांच्या जवळपास सर्व विषयांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारूडाचे उत्तर भारूडाने तर कविताचे उत्तर कविताने दिले. तरही काही राहिले असेल तर माफी मागतो.

वर्धा जिल्ह्याच्या विषयांवर शुक्रवारला बैठक ठेवण्यात आली होती. मात्र राज्याली कायदा सुव्यवस्था प्रश्‍नाचा निर्माण झाल्याने बैठकीला अनुपस्थित राहिले. याबद्दल ही मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली.

नागपूरच्या विषयाबाबतची बैठक मुंबईला होणार आहे. नागपूरला ही बैठक न घेण्याबद्दलही त्यांनी माफी मागितली. 


विधिमंडळात आणि बाहेरही मंत्री आणि आमदारही चटकन स्वतःची चूक मान्य करत नाहीत असा अनुभव आहे. तांत्रिक कारणे देऊन किंवा इतर बहाणे सांगून वेळ मारून नेण्याकडे नेते मंडळींचा कल असतो . पण उद्धव ठाकरे यांनी जे चुकले ते चुकले अशी भूमिका घेत सभागृहात माफी मागण्याचा उमदेपणा दाखवला याची ब्युरोक्रसीतही  चर्चा  आहे . 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे काम करीत आहेत असे विचारले असता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे  म्हणाल्या, मुख्यमंत्र्याच्या बोलण्या-वागण्यात शालीनता आणि विनम्रता दिसून येते. विरोधकांनी त्यांच्याकडून शिकायला हवे. विरोधकांनी विधानसभा निवडणुका निकालानंतर थोडी विनम्रता दाखवली असती तर ते आज सत्तेत असते आणि आम्ही विरोधी पक्षात असतो.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT