Karad Became HOTSPOT
Karad Became HOTSPOT 
राज्य

छत्री वापरा... कोरोनाला हरवा... : कऱ्हाड पोलिसांची अनोखी संकल्पना

सरकारनामा ब्यूरो

तांबवे (ता. कऱ्हाड) : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पोलिसांकडुन विविध उपायोजना राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग प्रत्येकाने पाळावे यासाठी  छत्री रॅली काढुन तांबवे गावात प्रबोधन केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हा पहिलाच प्रयोग येथे राबविण्यात आला. 

कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गावातील पहिलाच कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन त्याला घरी सोडण्यात आले. त्यामुळे तांबवे गाव प्रकाश झोतात आले होते. कोरोनाच्या
बाबतीत तांबवे गावात तब्बल 28 दिवस आरोग्य विभागामार्फत आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांमार्फत सर्व्हेची मोहिम राबवण्यात आली. त्याचबरोबर  प्रशासन आणि पोलिसांनी योग्य त्या उपाय योजना राबवल्या. त्याला तांबवे ग्रामपंचायतीनेही चांगली साथ दिली. त्यामुळे गावातील फैलाव रोखला.

पण लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सवलतीत लोक मोठ्याप्रमाणात बाहेर येऊ लागले. किराणा, भाजीपाला व इतर साहित्य खरेदीसाठी दुकानांत गर्दी होऊ लागल्याने
सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडू लागला. यावर पर्याय म्हणून खरेदीसाठी बाहेर येणाऱ्यांनी छत्री घेऊन बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सिंग राहण्यास मदत होणार
आहे. हे ओळखून कऱ्हाडचे पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांनी छत्री वापरा...कोरोनाला हरवा...अशी संकल्पना राबविली. 

त्यानुसार पोलिस प्रशासनाच्यावतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग प्रत्येकाने पाळावे. यासाठी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या
संकल्पनेतून कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  तांबवे गावात पोलिसांनी छत्री रॅलीचे आयोजन केले होते.

या रॅलीत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, पोलीस पाटील पवन गुरव, तांबवे ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. ही रॅली गावातील मुख्य बाजारपेठ, गांधी चौक, शिवतेज गल्ली मार्गे जोतिर्लिंग मंदिर, कुंभार गल्ली, रघुनाथ मंदिर, महादेव मंदिर, तांबजाई चौक मार्गाने काढण्यात आली. यावेळी कोरोनाबाबतीत जनजागृती करण्यात आली. तांबव्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या
संकल्पनेतून काढण्यात आलेल्या या छत्री रॅलीची चर्चा मात्र, सध्या जिल्हाभर होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT