Bjp Mla Suresh Dhas- Morcha news Beed
Bjp Mla Suresh Dhas- Morcha news Beed 
राज्य

वडेट्टीवार बोगस, फंटूश माणूस; जिल्ह्यात येऊनच दाखव : सुरेश धसांनी दिले आव्हान..

दत्ता देशमुख

बीड : मराठा समाजाचा सर्व्हे करणारा आयोगच बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवारच बोगस आहेत, फंटूश आहे, अशी खिल्ली उडवत जिल्ह्यात येऊनच दाखव, पोलिसांसोबतही ये, असे खुले आव्हान भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांना दिले. (Vadettiwar Bogus, Fantush; Come to the district and show it: Suresh Dhasa gave a challenge)

मराठा समाजाचे आरक्षण, कोविड काळात काम करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घ्यावे, भूसंपादनाचा मावेजा द्यावा, वाळू घाट सुरु करावेत, ऊसतोड कामगार कायदा करावा, आदी विविध मागण्यांसाठी सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. (Bjp Mla Suresh Dhas)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. यावेळी धस यांनी शिवसेनेवरही जोरदार टिकास्त्र सोडले. (Congress Minister Vijay Waddetiwar)

शिवसेनेचे लग्न, फेरे आमच्यासोबत आणि मंगळसुत्र दुसऱ्यांचे, नवरी पळाली अशी गत झाली असा टोलाही त्यांनी लगावला. सरकारी कार्यक्रमांना कोरोना नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदभार घेत असताना हजारोंची गर्दी जमते पण अधिवेशन म्हटले की सरकार कोरोनाच्या नावाखाली पळ काढते. लोकांसमोर जायला भिणारे हे सरकार आहे, असा आरोप धस यांनी यावेळी केला.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावली. १५ महिने ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीत तारखांवर तारखा लांबविल्या. मराठा आयोग बोगस म्हणणारा विजय वडेट्टीवारच बोगस, फंटूश असा एकेरी उल्लेख करत जिल्ह्यात येऊन दाखव असे आव्हानही त्यांनी दिले.

राष्ट्रवादी परिसंवाद कशाले काढते, आरक्षण द्या असे म्हणून कोणत्या ‘परी सोबत संवाद आहे’ असा चिमटाही त्यांनी काढला. आर. आर. पाटील, गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे महाराष्ट्राला गृहमंत्री लाभले. पण, अनिल देशमुखांसारखी डान्सबारकडून पैसे मागणारी औलादही आहे,असा घणाघातही धस यांनी केला  वाझेला १०० कोटी मागणारे उद्या कला केंद्रालाही  पैसे मागतील,अशी टीकाही शेवटी त्यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT