Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar 
राज्य

वडेट्टीवार म्हणाले, देवतळे समितीच्या अहवालानुसार उठवली दारूबंदी…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जात होती. Illegal liquor was being sold in large quantities यामध्ये बनावट दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. The ill effects of the ban were already visible यासंबंधी गठीत केलेल्या समितीने दिलेला अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता. The report was tabled at a cabinet meeting today त्यावर चर्चा होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी सांगितले. 

वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. अनेक लोक डुप्लीकेट दारूच्या व्यवसायात गुंतले होते. धक्कादायक म्हणजे बाया आणि लहान मुलंही या व्यवसायात गुंतली होती. पुरवठा पर्याप्त होत नसल्यामुळे ड्रग्जचीही विक्री चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. त्यामुळे देवतळे समितीच्या अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी ॲड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन झाले होते. त्यांनी चंद्रपूर ते नागपूर हजारो महीलांचा पायी मोर्चा काढला होता. हा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर धडकला होता. त्यानंतर सन २०१५ मध्ये जेव्हा भाजप - शिवसेनेची सरकार सत्तेत आली तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याची घोषणा केली होती. आज राज्याचे माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. 

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT