anuradha adik.png 
राज्य

पळून गेलेल्या ठेकेदाराचे काय? नगराध्यक्ष अनुराधा आदिक आज घेणार निर्णय?

शहर स्वच्छता आणि पळून गेलेल्या ठेकेदाराचाच प्रश्न आजच्या सभेत चर्चीला जाणार असल्याने श्रीरामपूर नगरपालिकेची आजची सभा लक्षवेधी ठरणार आहे.

गाैरव साळुंके

श्रीरामपूर : शहर स्वच्छता आणि पळून गेलेल्या ठेकेदाराचाच प्रश्न आजच्या सभेत चर्चीला जाणार आहे. नगराध्यक्ष अनुराधा आदिक आज याबाबत निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेची आजची सभा लक्षवेधी ठरणार आहे.

श्रीरामपूर नगरपालिकेत आज (ता. 26) सकाळी 11.30 वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या संदर्भात पालिकेने सर्व सभासद नगरसेवकांना नोटीसा पाठवून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभेत सर्वांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक केले असून, नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेला सर्व सभासद नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे.

दरम्यान, सभेमध्ये नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ठेक्याच्या निविदा प्रक्रियेबाबत चर्चा होणार असल्याने उद्याच्या सभा महत्वपूर्ण ठरणार असल्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या काळात पालिकेच्या स्वच्छतेच्या कामांच्या संबधीत ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण देत काम सोडून पळ काढल्याने शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे पालिकेने आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गासह काही कंत्राटी कामगारांना हाताशी धरुन शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू शहर परिसर मोठा असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागासमोर शहर स्वच्छ ठेवणे मोठे आव्हान होते. त्यामुळे खासगी ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगारांकडुन शहरातील स्वच्छतेची कामे केली जातात. परंतू संबधीत ठेकेदाराने गुरुवारी (ता. १२) रातोरात अचानपणे काम सोडून पळ काढल्याने नागरीकांतुन संताप व्यक्त होत होता.

विरोधी गटातील नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेत पालिका प्रशासनाने पाच दिवसांत शहर स्वच्छ करावे, अन्यथा पालिकेसमोर कचरा टाकुन आंदोलन करण्याचा इशार दिला होता. कोरोनाच्या संकटासह दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते. संबधीत ठेकेदाराने ठेका अर्धवट सोडून पालिकेची फसवणूक केल्याप्रकणी ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन दंडाची वसुली करण्याची भूमिका नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी घेतली होती. तसेच तातडीने विशेष सभेचे आयोजन करुन शहर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्याने आता उद्याची पालिकेची सभा लक्षवेधी ठरणार आहेत.
 

Edited By - Murlidhar Karale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT