New Mumbai Airport. 
राज्य

नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचे? ठाकरे, पाटील की वसंतराव नाईक…

नवी मुंबई विमानतळाला स्व. वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा नेत्यांनी लावून धरली आहे. स्व. वसंतराव नाईकांनी सतत साडेअकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. हरित क्रांतीचे ते जनक मानले जातात.

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : नवी मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळाला New Mumbai International Airport कुणाचे नाव द्यावे, यावरून राज्याचे राजकारण तापत चालले आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचे नाव देण्याची मागणी पुढे आल्यानंतर दि.बा. पाटील D.B. Patil यांचे नाव द्यावे, असा सूर निघाला. आता यवतमाळ जिल्ह्यातून स्वर्गीय वसंतराव नाईक Vasantrao Naik यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे. 

मागील काळात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून राज्यभरातील बंजारा समाज राज्य सरकारवर नाराज आहे. अशातच नवी मुंबई विमानतळाला स्व. वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा नेत्यांनी लावून धरली आहे. स्व. वसंतराव नाईकांनी सतत साडेअकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. हरित क्रांतीचे ते जनक मानले जातात. शिवाय नवी मुंबई वसविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. रोजगार हमी योजना हे त्यांचीच देन मानली जाते. बंजारा समजासाठी अजूनही ते दैवत आहेत. 

बंजारा समाजाचे असलेले संजय राठोड यांना काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. आज घडीला उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकही बंजारा समाजाचा प्रतिनिधी नाही. महाराष्ट्रात जवळपास दीड लाख बंजारा समाजाचे लोक आहेत.  यामुळे आघाडी शासनावर हा समाज काहीसा नाराज आहे. मुख्यमंत्री त्यांच्या या मागणीकडे कोणत्या दृष्टीने बघतात, याकडे बंजारा समाजासह जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.

रामदास आठवले म्हणाले होते, दि.बा. पाटलांचे नाव द्या..
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मारक आहे. समृद्धी महामार्गालाही बाळासाहेबांचेच नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येऊ नये, तर दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे. दि. बा. पाटील मोठे नेते होते, असे आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नागपूर दौऱ्यावर असताना म्हटले होते.  
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT