Anil Deshmukh
Anil Deshmukh 
राज्य

गृहमंत्र्यांनी "त्या' महिला सदस्याला का थांबवले बाहेर ? 

निलेश डोये

नागपूर : राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या एका महिला सदस्याला बघून ते नाराज झाले आणि त्यांना थेट बाहेर थांबण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना विषय मांडता आला नाही. बराच वेळ थांबल्यानंतरही पुन्हा बोलावणे न आल्यामुळे त्या निघून गेल्या. त्यांना भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते त्यांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे तेसुद्धा नाराज झाले. 

पक्ष बळकटीसाठी गृहमंत्री देशमुख यांनी काल जिमखाना येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील सदस्यही उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात जिल्हातील पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेतील सदस्य भेटण्याकरता कक्षात गेले. महिला सदस्याला पाहून ते नाराज झाले. संबंधित महिला सदस्य या दुसऱ्या गटातील असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा परिषेदत केदार गटासोबत त्यांनी जुळवून घेतल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेतील सभापती निवडणुकीच्या वेळेस मोठा ड्रामा झाला होता. संबंधित महिला सदस्याने केदार गटाला सहकार्य केल्याचीही चर्चा दबक्‍या आवाजात आहे. 

या प्रकारामुळे देशमुख गटाला सभापती पद मिळाले नाही. यामुळे देशमुखांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. बैठकीत केदार गटाला मदत केलेल्या "त्या' महिला सदस्यांला गृहमंत्री चांगलेच संतापले होते आणि त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले, अशीही माहिती आहे. या प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. काहींना तर प्रकरणच कळले नाही. संबंधित महिला सदस्य काही वेळ बाहेर थांबल्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. बैठकीनंतर हा चर्चेचा विषय बनला. बैठकीतून बाहेर आलेल्या काहींनी त्यांना शोध घेतला. पण नंतर त्या दिसल्या नाही. गावातून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट न झाल्याने नाराजी व्यक्त केली. कोरोना काळात चांगले कार्य करण्यांचा गौरव देशमुखांनी या बैठकीत केल्याचे सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT