Mahila Atyachar
Mahila Atyachar 
राज्य

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यावर सहकाऱ्याने केला अत्याचार, अन झाला फरार !

योगेश बरवड

नागपूर : ४६ वर्षीय महिला आणि ५५ वर्षाचा सोहेल पटेल. दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते. पक्षाच्या एका कार्यक्रमात दोघांची ओळख झाली. मग मैत्री झाली, त्यानंतर सोहेलचे महिलेच्या घरी जाणे-येणे वाढले. त्याने मैत्रीचे रुपांतर प्रेमात करुन आणि लग्नाचेही आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला, असा महिलेचा आरोप आहे. सोहोलच्या विरोधात तिने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हापासून सोहेल फरार आहे.

पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्यकर्ता सोहेल पटेल (५५, रा. जाफरनगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल पटेल हा विवाहित आहे. त्याची २०१८ मध्ये पक्षाच्या कार्यक्रमातच विवाहित ४६ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याने सोहेल नेहमी तिच्या घरी जायचा. सोहेल ओळखीचा असल्याने तिनेही कधी घरी येण्यास विरोध केला नाही.

एका कामानिमित्त जानेवारी २०१९ मध्ये सोहेल महिलेच्या घरी गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने महिलेवर अत्याचार केला. कोणाला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी महिला गप्प राहिली. यानंतर सोहेल महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा आणि अत्याचार करायचा. महिलेच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

नागपुरात व भंडाऱ्यातही केला अत्याचार
एकाच पक्षात असल्याने सोहेलची पक्षातील महिलेसोबत ओळख झाली. यानंतर दोघांची भेटीगाठी होऊ लागल्या. आध त्याने तिच्याशी मैत्री केली. चांगली मैत्री झाल्यानंतर सोहेल महिलेच्या घरी जाऊ लागला. एकेदिवशी घरी कुणीही नसल्याची संधी साधून सोहेलने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला पक्षाचे काम असल्याचे सांगून बाहेर घेऊन जायचा आणि अत्याचार करायचा. सोहेलने महिलेवर भंडारा व नागपुरातील अन्य ठिकाणी दुष्कृत्य केल्याचा आरोप आहे.

लग्नाचेही आमिष
सोहेलने महिलेचा फायदा घेण्यासाठी लग्नाचे आमिष दाखवले. तिनेही त्याच्या बोलण्यावर विश्वास केला. यानंतर त्याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सततच्या शारीरिक संबंधाला कंटाळल्याने महिलेने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोहेल हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT