वडगाव शेरी : पुणे शहरातील कोरनाग्रस्त नागरीकांच्या उपचारार्थ माझे तीन महिन्याचे वेतन घ्यावे. तसेच इतर नगरसेवकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे यांनी केले आहे.
पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या उत्कृष्ठ उपाययोजना सुरू आहेत. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे नागरीकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा आणि जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. या संकटाच्या काळात आपत्ती निवारण्यासाठी मी माझे नगरसेवकाचे वेतन महापौर निधी मध्ये जमा करणार आहे. अशी माहिती नगरसेविका श्र्वेता गलांडे यांनी दिली.
श्वेता गलांडे या पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 3 विमाननगर सोमनाथनगर येथील नगरसेविका आहेत. कोरोना विरोधात लढण्यासाठी सेवे सोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. माझ्यासोबत पालिकेतील माझे इतर सहकारी नगरसेवकही माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तीन महिन्यांचे वेतन महापौर निधीला देतील अशी आशा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.