आजचा वाढदिवस

आजचा वाढदिवस : योगेश टिळेकर, आमदार, भाजप (हडपसर, पुणे)

सरकारनामा ब्युरो

आमदार योगेश टिळेकर यांचे कुटुंब हे सांप्रदायिक वारसा असणारे कुटुंब आहे. त्यांची आई रंजना टिळेकर पुणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. यापूर्वीही त्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप युती न झाल्याने योगेश टिळेकर यांना ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. प्रचाराला कमी अवधी मिळाला असतानाही ते निवडून आले. त्यांनी उड्डाणपूल, कात्रज कोंढवा रस्ता, मांजरी पाणीपुरवठा योजना, वनविभागात उद्याने, कात्रज ते लोणीकंद हा नॅशनल हायवे, हडपसरमध्ये मेट्रो इत्यादी कामांना चालना दिली आहे. नम्र स्वभावामुळे ते त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT