आजचा वाढदिवस

आजचा वाढदिवस : एकनाथ खडसे (भाजप नेते, माजी महसूलमंत्री)

सरकारनामा ब्युरो


शेतकरी कुंटूबात जन्मलेले आमदार एकनाथराव खडसे भाजपचे नेते आहेत. विधानसभेवर सहा वेळा मुक्ताईनगर (जि.जळगाव) मतदार संघातून निवडून आले आहेत. सरपंच ते राज्याचा विरोधी पक्षनेता, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एक लढवैय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी त्यांनी रस्त्यापासून तर थेट विधीमंडळात त्यांनी आवाज उठविला आहे. 

राज्य विधासभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी राज्यातील विविध प्रश्‍नाला त्यांनी वाचा फोडली आहे. या शिवाय सन 1997 मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्रीपद त्यांच्याकडे असतांना त्यांनी कृष्णा खोरे, तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करून सिचनांच्या कामांना गती दिली. सन 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत गेल्या पंचवीस वर्षापासून युती असलेल्या शिवसेनेशी युती तोडून भारतीय जनता पक्ष स्वातंत्र लढला आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यात निवडून आला. त्यात त्यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती. 

मात्र त्यांना महसूल खात्यासह दहा खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. त्यांनी मात्र अवघे दीड वर्षाच्या काळात गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीत ते निर्दोष असल्याचा सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची मंत्रीमंडळात पुन्हा वर्णी लागण्याची प्रतिक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT