Gram Panchayat Election Results Sarkarnama
आजचा वाढदिवस

Gram Panchayat Election Results 2023: नाशिकमध्ये शिंदे गटासह आघाडीचे वर्चस्व!

Nashik Gram Panchayat 2023 : जिल्ह्यातील 44 ठिकाणी थेट सरपंच निवडण्यात आले. तर 43 ठिकाणी मतदान घेण्यात आले.

Mangesh Mahale

Nashik: राज्यातील सत्तातरानंतर प्रथमच होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटासह महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील 44 ठिकाणी थेट सरपंच निवडण्यात आले. तर 43 ठिकाणी मतदान घेण्यात आले. यात शिंदे गटासह महाविकास आघाडी आघाडीचे वर्चस्व दिसून आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण 48 ग्रामपंचायतींपैकी 43 ठिकाणी 200 जागांसाठी रविवारी मतदान झाले. यात राजकीय पक्षांचे चिन्ह नसले तरी स्थानिक स्तरावरील गट ज्या राजकीय पक्षांना मानतात त्या आधारे निवडून आलेल्या सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांची विभागणी केली जात आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत रविवारी 51 टक्के मतदान झाले.

आज तहसील कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालांची उधळण करत जल्लोष साजरा केला. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाला जनाधार मिळणार नाही, असा अंदाज बांधला जात होता; परंतु स्थानिक स्तरावरील नेत्यांनी केलेली मोर्चेबांधणी व त्याला सत्ताधारी गटाने दिलेली साथ, यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटाचेही वर्चस्व दिसून आले आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गटाला मर्यादित जागांवर समाधान मानावे लागल्याचे दिसून येते. अजित पवार गटाने ही जिल्ह्यात मुसंडी मारल्याचे या निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झाले आहे. शरद पवार गटाला फारसे यश आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये सत्ताधारी शिंदे गट तसेच अजित पवार गट व काही ठिकाणी भाजपला मानणाऱ्या सदस्यांचा विजय झाल्याचे दिसून येते.

नाशिक तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व

नाशिक तालुक्यातील जलालपूर गंगा माळुंगी महादेवपुर व सुभाषनगर या चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यात दोन ठिकाणी शिंदे गटाचे सरपंच निवडून आले आहेत. तर इतर ठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आल्याचे दिसले. जलालपूरला भगवान गबाले तर महादेवपुर मध्ये अंबिका पोटिंदे हे दोन सरपंच शिंदे गटाचे आहेत तर भारतीबाई खोडे व मनीषा फसाळे हे सरपंच इतर पक्षांना मानणारे असल्याचे ग्रामपंचायतीच्या प्राथमिक निकालावरून दिसून येते.

जिल्ह्यातील निकाल दृष्टीक्षेपात

  • निवडणूक घोषित झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या-48

  • निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या- 416

  • बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य -184

  • प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्राम पंचायतींची संख्या -43

  • एकूण निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या- 200

  • बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या- 4

  • एकूण 44 ठिकाणी प्रत्यक्ष सरपंच पदाची निवडणूक झाली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT