NCP Morcha in Dhule
NCP Morcha in Dhule Sarkarnama
आजचा वाढदिवस

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी इक्बाल मिर्ची कडून किती कोटी घेतले?

Sampat Devgire

धुळे : मुंबईतील (Mumbai) १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमचा उजवा हात इक्बाल मिर्ची याचा संबंध आणि सहभाग असलेल्या आर. के. डब्ल्यू. कन्स्ट्रक्शनकडून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या भाजपने (BJP) देणगीच्या नावावर २० कोटी रुपयांची खंडणी गोळा केल्याचा आरोप आहे. त्याचा सखोल तपास करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शहरात मोर्चा काढला.

शहरातील गांधी पुतळ्यापासून आग्रा रोड, जे. बी. रोड, जेल रोडमार्गे मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयावर आला. यावेळी मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांना देण्यात आले.

पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंद्रीय आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर भाजपला ज्यांनी देणगी दिली, त्यांची नावे प्रसिद्ध केली आहेत. त्या यादीत २०१४ व २०१७ या आर्थिक वर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपये दोन वेळेस देणगीरूपाने मिळाल्याचे दर्शविले आहे. आर. के. डब्ल्यू. कन्स्ट्रक्शन कंपनी सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या मालकीची आहे. या सर्व कंपन्यांमध्ये इक्बाल मिर्ची या अमली पदार्थाच्या व्यापाऱ्याची गुंतवणूक असल्याचे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद आहे. यावरून दहशतवाद्यांशी संबंधित व काही बँक कंगाल करणाऱ्या राकेश वाधवानकडून भाजपने २० कोटी रुपये घेतल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा चौकशीतून सखोल तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मोर्चात डॉ. अनिल पाटील, संजय बगदे, सरोज कदम, शोभा आखाडे, सुरेखा नांद्रे, छाया सोमवंशी, उषा पाटील, जया साळुंके, ज्योती चौधरी, सीमा महाले, अब्दुल लतीफ अब्दुल हमीद, प्रमोद साळुंके, मुक्तार मन्सुरी, वसीम मंत्री, जमीर शेख, प्रशांत भदाणे, अविनाश लोकरे, वामन मोहिते, विजय वाघ, डॉ. संजय पिंगळे, हाशिम कुरेशी, मनोज वाल्हे, शकील खजूरवाले आदींसह मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते सहभागी झाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT